ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या पीएवर गंभीर आरोप …..

565 0

अहिल्यानगर(AHILYA NAGAR)महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(UDDHAV TACKERAY पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(SUSHMA ANDHARE)यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सुषमा अंधारे(SUSHMA ANDHARE) यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार(AJIT PAWAR) गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप(SANGRAM JAGTAP)  यांच्याशी संबंधित व्यक्ती विरोधी पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या घराबाहेर उभ्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, आमदार जगताप यांचे स्वीय सहायक आणि बॉडीगार्ड रिव्हॉल्वरसह तेथे उपस्थित होते. या पोस्टमध्ये त्यांनी सत्तेच्या जोरावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे तसेच या पोस्टसोबत त्यांनी #दहशत #ठोकशाही असे हॅशटॅगही वापरले आहेत.

दरम्यान, अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून अजित पवार(AJIT PAWAR) राष्ट्रवादी काँग्रेस(CONGRESS) आणि भाजप(BJP) यांची युती निवडणूक लढवत आहे. या युतीत एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) यांच्या शिवसेनेला स्थान देण्यात आले नसल्याचे चित्र आहे. याच काळात अजित पवार गटाचे दोन आणि भाजपचे तीन उमेदवार जवळपास बिनविरोध निवडून आल्याची चर्चा आहे.

संपूर्ण प्रकरणावर आमदार संग्राम जगताप यांची अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, सुषमा अंधारे यांच्या व्हिडिओमुळे अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण चांगलेच खवळले आहे.

Share This News
error: Content is protected !!