उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR) यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी सुरू झाल्या आहेत. रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी कोणाची निवड होणार, याबाबत चर्चांना उधाण आलं असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचाली वेगवान झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर एकमताने निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR) यांच्या नावाची जोरदार चर्चा असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ(CHAGAN BHUJABAL) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. उद्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला, तर त्याच दिवशी नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडू शकतो, असं त्यांनी सांगितलं आहे. या बैठकीकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून, उद्याच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे.