थांग-ता, गतका क्रीडा प्रकारातही महाराष्ट्र अव्वल;शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे जोरदार सराव शिबिर सुरू

335 0

हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया गेम्ससाठी महाराष्ट्राच्या गतका आणि थांग ता या क्रीडा प्रकारातील संघाचा सराव सुरू आहे. येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात (बालेवाडी) हे सराव शिबिर सुरू आहे. हे दोन्ही क्रीडा प्रकार नवीन आहेत. परंतु यातही महाराष्ट्राने यश मिळवले आहे. पारंपरिक क्रीडाप्रकाराचं जतन व्हावं, या उद्देशानं खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये मल्लखांब, योगासनं, गटका, कलरीपयटू आणि थांग-ता या क्रीडा प्रकाराचा समावेश केल्याचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री ठाकूर यांनी नुकतंच सांगितलं.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून गतका आणि थांग-ता या क्रीडा प्रकारात खेळाडू क्रीडाकौशल्य दाखवित आहेत.

काय आहे थांग-ता गतका

थांग ता हा क्रीडा प्रकार महाराष्ट्रासाठी नवीन आहे. ११९३ पासून तो खेळला इथे खेळला जातो. या खेळाच्या २६ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या आहेत. परंतु त्याचा खेलो इंडिया गेम्समध्ये समावेश झाला आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हा खेळ खेळला जातो. हा मणिपुरी पारंपरिक क्रीडा प्रकार आहे. प्रेमकुमार सिंग यांनी प्रचार आणि प्रसार केला. महाराष्ट्रात महावीर धुळधर यांनी प्रचार केला. तो भाला (ता) आणि तलवारीने (थांग) खेळला जातो. परंतु खेळात समाविष्ट करताना त्यात बदल करण्यात आला आहे. गतका हा पंजाबमधील पारंपरिक प्रकार आहे. तो मार्शल आर्टच्या जवळचा आहे. दोन व्यक्तींमध्ये ती लढाई असते.

Share This News
error: Content is protected !!