SOLAPUR NEWS : सोलापूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीवर बंदी

77 0

SOLAPUR NEWS : गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहतो, पण यामध्ये डीजे आणि डॉल्बी सिस्टीमचा कर्णकर्कश आवाज नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याची तक्रार अनेक वर्षांपासून (SOLAPUR NEWS) होत आहे. गेल्या पंधरवड्यापासून सोलापुरात “डॉल्बी मुक्ती”साठी जनआंदोलन उभारण्यात आले होते. या मागणीची दखल घेत अखेर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईट शोवर स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे.

TOP NEWS MARATHI : शरद पवारांनी मराठा समाजाचा वाटोळं केलं,मराठा आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळेंना अडवलं

नागरिकांचा दिलासा (SOLAPUR NEWS) 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना दिलासा मिळाला आहे. ध्वनी प्रदूषणामुळे अनेकांना डोकेदुखी, बेचैनी, झोपेचा त्रास, तर काहींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले होते. लेझर बीम आणि प्रखर प्रकाशामुळे काहींना दृष्टीसंबंधी त्रास जाणवत होता. त्यामुळे ही बंदी सर्वसामान्यांच्या हितासाठी योग्य निर्णय मानली जात आहे.

गणेशोत्सवापुरतीच मर्यादा?

ही बंदी सध्या केवळ गणेश विसर्जन मिरवणुकीपुरतीच लागू आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी वर्षभरासाठीच डॉल्बी आणि डीजेवर बंदी असावी अशी मागणी केली आहे. कारण इतर धार्मिक वा सामाजिक मिरवणुकीतही याच पद्धतीने आवाज प्रदूषण होते. काही वेळा डीजेच्या कंपनांमुळे आसपासच्या इमारतींमध्ये कंप जाणवतो, तर हृदयविकार असलेल्या रुग्णांचीही प्रकृती बिघडल्याचे उदाहरणे नोंदवली गेली आहेत.

Sanjay Raut On Maratha Reservation : उदयनराजे, शिवेंद्रराजेंनी जरांगे पाटलांच्या मंडपात उपोषणाला बसलं पाहिजे ;संजय राऊत नेमकं काय म्हणाले ?

प्रशासनाची भूमिका

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिलेल्या आदेशानुसार विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य, ढोल-ताशे वापरण्यास हरकत नाही. मात्र डॉल्बी व लेझर शो पूर्णपणे बंद राहणार आहे. पोलिस प्रशासनाने याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

सोलापूरकरांनी दिलेल्या आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आला असला, तरी आता पुढील काळात हा निर्णय कायमस्वरूपी होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!