मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व वॉरंट जारी

312 0

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शिवडी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं असून मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध भादंवि कलम 499, 500 साठी वॉरंट जारी केले.

संजय राऊत यांनी वारंवार आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले अशी तक्रार मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात केली होती. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!