शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी केलेल्या बलात्कार केलेल्या प्रकरणातील मुलगी पुण्यात आली आहे. भाजप च्यानेत्या चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक या प्रकरणात पोलीस कारवाई करत नाही .असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यावर या प्रकरणी दूध का दूध पाणी का पाणी येत्या तीन ते चार दिवसात होईल .असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व राष्ट्रवादीचे नेत्या या पुणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे पुणे पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता यांची चाकणकर यांनी आज भेट
घेतली.
त्यानंतर रूपाली चाकणकर यांनी विविध मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात चित्रा वाघ यांना पीडित मुलगी मदत करते . असे विरोधकांचे म्हणणे आहे त्यावर रूपाली चाकणकर म्हणाल्या,रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे .
मुलगी आणि चित्रा वाघ यांची नार्को चाचणी करण्याची मागणी.
मागच्या आठवड्यात वडगाव शेरीत झालेल्या एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावर रूपाली चाकणकर म्हणाल्या,वडगाव शेरीतील पीडित मुलीला आज आयसीयूमधून जनरल वॉर्डात शिफ्ट करण्यात आलं आहे, त्यांना पूर्णपणे मदत दिली जाणार, धर्मदाय आयुक्तांकडून रुग्णालयाचा खर्च केला जाणार. यासंदर्भात पुणे पोलिसांना आम्ही तपास करण्याचे आदेश दिले आहेत अहवाल आल्यावर कारवाई होणार.असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.
वडगाव शेरी व रघुनाथ कृचीक प्रकरणात विरोधकानी पोलिसांना बदनाम करण्याचा विडा उचलला आहे. असा आरोप रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला.
राज्य कुटूंब कल्याण विभागाने जे किट आशा वर्कर्स दिल आहे. त्याबाबत ज्या आक्षेपार्ह वस्तू देण्यात आल्या आहेत.
त्याबाबत मला माहिती मिळाली आहे त्याची चौकशी केली जाणार.
प्रज्वला योजने मध्ये दुरुपयोग करण्यात आला आहे. अशी टीका काल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे त्यावर यासंदर्भात माहिती घेण्यात आली आहे.पक्षाच्या प्रचारासाठी या योजनेचा निधी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. असे रूपाली चाकणकर म्हणाल्या.