shekap jayant patil critisese sunetra pawar

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर ; शेकापच्या जयंत पाटलांची टीका

67 0

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शपथविधीच्या वेळेवरून चर्चेला उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR) यांनी शपथ घेतल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे शेकाप नेते जयंत पाटील(SHEKAP JAYANT PATIL) यांनी या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शपथविधी 15 दिवसांनी झाला असता तर नेमकं काय बिघडलं असतं, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

जयंत पाटील(JAYANT PATIL)यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत, हिंदू-हिंदूचा मुद्दा उपस्थित करून मते मागणाऱ्यांना या प्रकाराबद्दल काहीच वाटत नाही का, असा प्रश्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतर सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR) यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याने राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार(AJIT PAWAR)  यांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार(SUNETRA PAWAR) यांच्या शपथविधीमुळे सत्ताकारणातील हालचालींना वेग आला असून, त्यावर विरोधकांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या पार्श्वभूमीवर जयंत (JAYANT PATIL) पाटील यांनी राजकीय निर्णयांची नैतिकता आणि वेळेचे औचित्य यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर नव्याने चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

 

Share This News
error: Content is protected !!