Leopard Attack

Leopard Attack : बिबट्या कुत्र्याला घाबरुन पळाला; CCTV फुटेज आले समोर

555 0

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जंगली प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्राणी बेधडकपणे येऊन घरात शिरत असून पाळीव प्राण्यांवर, लोकांवर हल्ला (Leopard Attack) करताना दिसत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांच्या मनात जंगली प्राण्यांची दहशत (Leopard Attack) निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी बिबट्या, वाघ, चित्ता मानवी वस्तीत घुसून हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

काय घडले नेमके?
नाशिकमधील आडगाव परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेचे CCTV फुटेजसुद्धा समोर आले आहे. आडगावच्या पाझर तलाव भागातील प्रभाकर माळोदे यांच्या बंगल्यात शिरलेल्या बिबट्यानं बंगल्याच्या दारात बांधलेल्या एका कुत्र्यावर हल्ला केला. याचं वेळी बाजूला असलेल्या दुसऱ्या कुत्र्याने बिबट्यावर हल्ला चढवल्याने बिबट्यानं घाबरून धूम ठोकली. त्यामुळे कुत्र्याचा जीव वाचला आहे.

या परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा मुक्त संचार असल्यानं नागरिकांमध्ये भीतीच वातावरण (Leopard Attack) आहे. त्यामुळे येथील लोकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. या अगोदरदेखील अशा काही घटना घडल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!