SANJAY RAUT

अजित पवारांच्या निधनावर संजय राऊतांचा मोठा दावा; अपघाताच्या निष्पक्ष चौकशीची मागणी

63 0

अजित पवार (AJIT PAWAR)यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे(SHIVSENA UBT) खासदार संजय राऊत(SANJAY RAUT) यांनी भाजपवर(BJP) गंभीर आरोप केले आहेत.

राऊत म्हणाले की, अजित पवार भाजपच्या कथित भ्रष्टाचाराबाबत सातत्याने बोलत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील(PCMC) कुत्र्यांच्या नसबंदी प्रकरणासह अनेक गैरव्यवहारांची माहिती त्यांच्याकडे होती. दीर्घकाळ अर्थमंत्री राहिल्यामुळे भाजपशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे अजित पवारांकडे होती, असा दावा त्यांनी केला.

अजित पवारांचा (AJIT PAWAR) मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत, त्यांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी राऊत (SANJAY RAUT)यांनी केली. अजित पवार(AJIT PAWAR) पुन्हा शरद पवार(SHARAD PAWAR)यांच्याकडे गेले असते, तर भाजपाच्या ‘ऑपरेशन लोटस’ला मोठा धक्का बसला असता, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाध्यक्षपदासाठी घाई केल्याचा आरोप करत, भाजपावर विश्वास ठेवता येणार नाही, असे मत संजय राऊत(SANJAY RAUT) यांनी व्यक्त केले. अजित पवारांच्या(AJIT PAWAR) निधनाने आजही महाराष्ट्र हादरलेला असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This News
error: Content is protected !!