SANJAY RAUT

‘सून रुसली, सासरा ऐकेना’ संजय राऊतांचा भाजप शिंदे गटावर हल्लाबोल

66 0

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊनही मुंबई(MUMBAI) महापौरपदाची निवड अद्याप झालेली नाही. भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाकडून (SHIVSENA)गटनोंदणी पूर्ण न झाल्याने महापौर(MAYOR)निवड फेब्रुवारीपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.(SANJAY RAUT)

या महिन्याअखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता होती. मात्र भाजप(BJP) आणि शिंदे (SHIVSENA) गटाने अद्याप कोकण आयुक्तांकडे गटनोंदणी न केल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता फेब्रुवारीतच नवी महापौर निवड होईल, अशी चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (SANJAY RAUT) यांनी भाजप-शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. शिंदे गट आणि भाजपची गटस्थापना अजून झालेली नाही. बहुतेक ही गटस्थापना ‘घटस्थापने’पर्यंत जाईल, असा टोला त्यांनी लगावला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे(EKNATH SHINDE)आणि भाजप यांच्यात काहीच जुळत नाही. शिंदे गट नाराज असून दिल्लीचे फेरे मारत आहेत, मात्र दिल्लीतील सासरे ऐकून घेत नाहीत. त्यामुळे इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच भाजपच्या भूमिकेवर टीका करत “माझं ते माझंच, तुझं ते आमच्या बापाचं,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, महापालिका निवडणुकांनंतर ठाकरे गटाचे काही नगरसेवक संपर्कात नसल्याच्या चर्चांवरही राऊतांनी(SANJAY RAUT) उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. कल्याण-डोंबिवलीत ‘लापता’ म्हणून पोस्टर लावू. भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यालयाबाहेर ‘आपण यांना पाहिलंय का? चे पोस्टर लावू अशा उपहासात्मक शब्दांत त्यांनी या मुद्यावर टीकास्त्र सोडलं.

Share This News
error: Content is protected !!