Sangeeta Pawar Kirtankar Case: छत्रपती संभाजी नगर मधील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे दिनांक 28 जून रोजी
महिला कीर्तनकार ह भ प संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली.
एका महिला कीर्तनकाराची अशाप्रकारे झालेली हत्या अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारी घटना ठरली.
या प्रकरणामध्ये आता महत्त्वाची अपडेट हाती आली असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
त्यामुळे लवकरच त्यांच्या हत्येचं कोडं उलघडणार आहे चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती…
भैय्या पाटील यांच्या मुलीनेच नवऱ्याची केली फसवणूक
चार दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील आश्रमामध्ये संगीता ताई महाराज यांची अज्ञातांनी दगडाने ठेचून हत्या केली या प्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं.
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. एका आरोपीला वैजापूर तालुक्यातून ताब्यात घेण्यात आलं
तर दुसऱ्या मुख्य आरोपीच्या मुस्क्या आवळण्यासाठी छत्रपती संभाजी नगर गुन्हे शाखेच्या पथकाने थेट मध्य प्रदेशात धाड टाकली.
पोलिसांच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
पण मिळालेल्या माहितीनुसार ह.भ.प संगीताताई महाराज यांना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
एवढेच नाही तर वैजापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रारही त्यांच्याकडून देण्यात आली होती. संगीताताई महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती अशी माहिती समोर आली होती.
जागेच्या वादातून शेजाऱ्यांशी भांडण असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
“मी एकटी राहते मला मारून टाकतील” अशी धमकी दिल्याचं संगीताताई महाराज यांनी यापूर्वीच सांगितलं होतं.
संगीताताई पवार या भागवत कथेसाठी 2009 आणि 2010 साली दोन वर्ष वृंदावनला गेल्या होत्या.
भागवत कथेची पूर्ण तयारी करून त्या परतल्या होत्या सहा महिन्यांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली.
दरम्यान आश्रमासाठी पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी जागा घेतली होती. त्या जागेवर त्या दोन महिन्यांपासून स्थायिक झाल्या होत्या.
नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात जागेच्या वादावरून शेजाऱ्यांशी त्यांचं भांडण झाल्याने संगीताताई महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
याबाबतची तक्रारही त्यांनी पोलिसात दिली होती. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर तपासाला आणखी वेग आला आणि संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
Junner Crime News : जुन्नर मधील रिव्हर्स वॉटरफॉल जवळील दरीत आढळले मृतदेह
आता राजभरात खळबळ माजवणाऱ्या या प्रकरणात ताब्यात असलेल्या आरोपींकडून कोणती माहिती समोर येते ?
शिवाय संगीता ताईंना धमकी देणाऱ्यांचाच त्यांच्या हत्येमध्ये हात आहे का? की हे आरोपी दुसरेच कोणीतरी आहेत या सगळ्या गोष्टी समोर येतील. त्यामुळे आता राज्यभराचं लक्ष या प्रकरणातील पोलीस तपासाकडे लागलं आहे.