छत्रपती संभाजीनगरमधील(CHATRAPATI SAMBHAJINAGAR) एमआयएमच्या(MIM)कार्यकर्त्यांमध्येच मोठा गोंधळ झाला. एमआयएमचे समर्थक आणि नाराज कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून या गोंधळात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील(IMTIAZ JALEEL) यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. यावेळी जलील यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती आहे.
इम्तियाज जलील(IMTIAZ JALEEL) यांची आज संभाजीनगरमध्ये (SAMBHAJINAGAR) पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. पदयात्रेला सुरुवातीपासूनच काही कार्यकर्त्यांचा विरोध होता. जलील यांच्यासमोरच नाराज कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत पदयात्रा अडवण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर दोन गटांमध्ये शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला असून सौम्य लाठीचार्जही करण्यात आला.
दरम्यान, जलील यांची थार गाडी परिसरातून जात असताना नाराज कार्यकर्त्यांनी वाहनावर हल्ला चढवला. हल्ल्याच्या वेळी इम्तियाज जलील(IMTIYAZ JALIL) हे गाडीच्या पुढील सीटवर होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, गाडीत बसलेल्या एका कार्यकर्त्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे समजते. ही घटना प्रचार रॅलीदरम्यान घडली आहे.
संभाजीनगरमध्ये (SAMBHAJINAGAR)एमआयएमने यावेळी २२ माजी नगरसेवकांची तिकिटे कापून नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच पक्षांतर्गत नाराजी दिसून येत असून, आजच्या घटनेतून त्याचेच पडसाद उमटल्याचे चित्र आहे.