MAKRAND JADHAV PATIL: मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट;अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा

97 0

MAKRAND JADHAV PATIL: राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील (MAKRAND JADHAV PATIL) यांनी

आज मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन

अतिवृष्टीमुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

पावसाचं थैमान कधी थांबणार?हवामान तज्ज्ञ डॉ. एस. डी. सानप EXCLUSIVE

मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी या भेटीवेळी राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण परिस्थितीची माहिती घेऊन

पावसामुळे उद्भवलेली पूरस्थिती, वाहतुकीतील अडथळे, पिकांचे नुकसान आणि आपत्कालीन सेवांच्या कार्यवाहीची माहिती घेतली.

आवश्यक तेथे राज्य आपत्ती प्रतिसादात दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके पाठवावीत अशा सूचना त्यांनी दिल्या.

Maharashtra Rain Alert : राज्यातील 5 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट ; राज्यभरातील पावसाचा आढावा

अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर सुरक्षितस्थळी करावे.

या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात.

यासाठी प्रशासनाने वेगाने कारवाई करावी, आशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पावसामुळे बाधित होणाऱ्या शेत पिकांचे तातडीने पंचनामे करावेत,

Maharashtra Rain Alert : राज्यातील 5 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट ; राज्यभरातील पावसाचा आढावा

अतिवृष्टी काळात विशेषतः नद्या, धरणे व पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवून

आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करून हवामान विभागाशी सतत संपर्क साधून

येणाऱ्या पावसाचा अंदाज जनतेपर्यंत वेळीच पोहचवण्यात याव्यात

असेही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.

Maharashtra Rain Alert : राज्यातील 5 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट ; राज्यभरातील पावसाचा आढावा

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली परिस्थिती, मदत व बचाव कार्य या विषयी माहिती दिली.

CHANDAN NAGAR POLICE NEWS:चुलतीला “आय लव्ह यू” म्हणणं बेतलं जीवावर; चंदननगरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

KHED KUNDESHWAR NEWS: कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला;9 जणांचा मृत्यू 25 जण जखमी

Share This News
error: Content is protected !!