Pune Metro:पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका ! मेट्रोचं जाळं विस्तारणार, 683 कोटी 11 लाखांची मंजुरी

74 0

Pune Metro: दुपारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये पुण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत. हे निर्णय पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी कारक ठरणार आहेत, त्याचबरोबर(Pune Metro) शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी देखील या निर्णयांचा मोठा लाभ होताना दिसणार आहे.

TOP NEWS MARATHI: सरकारनं ओबीसी आरक्षण संपवलं?

नागपूर, मुंबई आणि पुणे मेट्रोसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पुणे मेट्रोच्या मार्गिका 2 (स्वारगेट ते कात्रज, वनाज ते रामवाडी) आणि मार्गिका 4 (वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली) साठी कर्जाला मंजुरी मिळाली आहे. याव्यतिरिक्त, खडकवासला, स्वारगेट, हडपसर-खराडी आणि नळ स्टॉप, वारजे-माणिकबाग या उपमार्गांनाही परवानगी मिळाली आहे, ज्यामुळे शहराच्या विविध भागांना जोडणे अधिक सोपे झाले आहे.

पुणे मेट्रोच्या विस्तारासाठी दोन नवीन स्थानकांना मान्यता मिळाली आहे: बालाजीनगर आणि बिबवेवाडी. ही नवीन स्थानके स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर उभारण्यात येतील. त्याचबरोबर, कात्रज मेट्रो स्टेशनचे दक्षिणेकडे सुमारे 421 मीटर स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 683 कोटी 11 लाख रुपयांची तरतूद मंजूर झाली आहे, ज्यामुळे मेट्रोचे जाळे अधिक विस्तृत आणि लोकाभिमुख होणार आहे.

Maratha Reservation Protest : अखेर सरकारकडून जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य; आंदोलन घेणार मागे

या निर्णयांमध्ये पुणे ते लोणावळा लोकल (उपनगरीय रेल्वे) च्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गांच्या प्रकल्पासाठी खर्चाची तरतूद करण्याचाही समावेश आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या धर्तीवर या खर्चाचा भार उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुणे आणि लोणावळा दरम्यानच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. हे मंत्रिमंडळातले निर्णय पुणेकरांच्या चांगलेच पथ्यावर पडणार आहेत. यामुळे प्रवासाला लागणारा वेळ कमी होऊन नागरिकांना सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल, तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होईल.

Share This News
error: Content is protected !!