पूजा खेडकर हिची उमेदवारी यूपीएससीने काल रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने देखील पूजाला दणका दिला आहे. आज न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. पूजाने स्वतःबरोबरच इतर ओबीसी उमेदवारांना देखील अडचणीत आणले आहे.
न्यायालयाने पूजा खेडकरचा जामीन अर्ज भेटायला मुळे तिच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. मात्र दुसरीकडे न्यायालयाने तपास यंत्रणांनी तपास आणखी वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. ज्यामुळे इतर ओबीसी उमेदवारांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. इतर उमेदवारांनीही अशाच पद्धतीने खोटं दिव्यांगत्व आणि ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतला आहे का याचीही चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पूजा खेडकरसह 2022 ला युपीएससीत निवड झालेल्या सर्व ओबीसीच्या उमेदवारांची माहिती घ्या आणि नॉन क्रिमिलेअर बनावट तर नाही ना हे तपासा. त्याचबरोबर 2022 च्या यादीतील दिव्यांग उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करा. पूजा खेडकरला कोणत्या अधिकाराने मदत केली आहे का याचीही चौकशी करा, असेही आदेश दिल्ली पटियाला कोर्टाने दिले.
न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे आता अनेक ओबीसी उमेदवारांचा पोटात गोळा आला आहे. तपास यंत्रणांच्या तपासातून आणखी पूजा खेडकर निष्पन्न होतात का ? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.