Ravindra Chavan

अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपमध्ये दाखल ..

415 0

नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून तीन आठवडे होत नाहीत तोच अंबरनाथमध्ये(AMBARNATH) मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. भाजप,(BJP) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या(CONGRESS) नगरसेवकांनी एकत्र येत युती केल्यानंतर काँग्रेसने आपल्या १२ नगरसेवकांना निलंबित केले. या कारवाईनंतर हे सर्व १२ नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण(RAVINDRA CHAVAN) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी( NARENDRA MODI)यांच्या नेतृत्वाखाली ‘सबका साथ, सबका विकास’ या विचारातून भाजप काम करत असून विकासासाठी आमच्यासोबत येणाऱ्यांचे स्वागत आहे.

अंबरनाथ नगर परिषदेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकांनी मिळून ३१ नगरसेवकांचे संख्याबळ जमवत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली असून अभिजित करंजुळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, निलंबित नगरसेवकांनी स्थानिक विकासासाठी आघाडीला पाठिंबा दिला होता, पक्ष सोडलेला नव्हता, असा दावा केला . संवाद न साधता कारवाई झाल्याने नाराजी व्यक्त करत अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Share This News
error: Content is protected !!