पुणे(PUNE) आणि पिंपरी चिंचवड (PIMPRI CHINCHWAD) महापालिका निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(NCP) एकत्र लढवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR)आणि खासदार सुप्रिया सुळे(SUPRIYA SULE)यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर पुण्यात आज संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR), खासदार सुप्रिया सुळे (SUPRIYA SULE) आणि खासदार अमोल कोल्हे (AMOL KOLHE)उपस्थित होते. जाहीरनाम्यात शहराच्या विकासासाठी ठोस आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे.
अजित पवार यांनी जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासनांची माहिती देताना सांगितले की, पुणे (PUNE)आणि पिंपरी चिंचवडमध्ये नियमित नळपाणीपुरवठा, पाण्याच्या उंच टाक्यांची उभारणी, प्रदूषणमुक्त शहराचा संकल्प आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना केल्या जातील.मेट्रो, ‘पीएमपीएमएल’ प्रवास मोफत आणि विद्यार्थ्यांना मोफत टॅब. तसेच नवीन शाळांना मान्यता देणे आणि झोपडपट्टी पुनर्वसनाला गती देणे हेही प्राधान्यक्रमावर असणार आहे.
सुरुवातीला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक अजित पवार भाजपासोबत लढणार, अशी चर्चा होती. मात्र अखेर भाजपासोबत नाही, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवतील, हे स्पष्ट झाले आहे. राज्यात सत्तेत असतानाही स्थानिक पातळीवर वेगळी राजकीय मांडणी केल्याचे चित्र आहे.
या युतीबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, अजित पवार आणि माझ्यातील कौटुंबिक संबंध नेहमीच चांगले राहिले असून ते कधीही तुटलेले नाहीत. राजकीय मतभेद पूर्वीही होते आणि आजही आहेत. मात्र, महापालिका निवडणुकांमध्ये अनेक पक्ष अशा प्रकारच्या युती करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची ही एकत्रित वाटचाल मतदारांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.