Panvel News : आज नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी चालू असलेल्या (Panvel News) लेडीज बारवर तोडफोड केली. ही कारवाई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर घडली आहे. नवी मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी असा सवाल उपस्थित केला की, “जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी स्थापन केली होती त्या रायगड परिसरात आज मोठ्या प्रमाणावर लेडीज बार सुरू आहेत. मराठी माणसाला याची लाज वाटत नाही का?” असं राज ठाकरे यांनी म्हंटल होतं त्यानंतर
काही तासांतच मनसे नवी मुंबईतील पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि काही लेडीज बारवर थेट कारवाई करत तोडफोड केली.
*TOP NEWS MARATHI : MNS DANCEBAR PANVEL : पनवेलमधील डान्सबार मनसेनं फोडला
नेमकं घडलं काय ?
पनवेलमध्ये सुरु असलेल्या एका लेडीज डान्स बारवर मनसे कार्यकर्त्यांनी अचानक धडक देत जोरदार तोडफोड केली. कोनगाव परिसरातील ‘नाईट राईड डान्स बार’ हे मनसेच्या रोषाचे केंद्र ठरले. हे प्रकरण घडलं आहे, त्यामागे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एका भाषणातील भाष्य कारणीभूत ठरले आहे. अशी चर्चा आहे.
राज ठाकरे काल (३ ऑगस्ट) रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी रायगड जिल्ह्यात वाढत्या डान्स बार आणि त्यातून स्थानिक तरुणांच्या होत असलेल्या अधःपतनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी बार बंद करण्याची गरजही स्पष्ट शब्दांत मांडली.
त्यांच्या या भाषणानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी मनसे कार्यकर्ते पनवेलमधील ‘नाईट राईड’ बारमध्ये पोहोचले आणि ‘खळखट्याक’ स्टाईलने बारमध्ये तोडफोड करत आपला विरोध व्यक्त केला. यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. राजकीय पातळीवरही या घटनेची दखल घेतली जात असून, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने याकडे पोलिसांकडून गांभीर्याने पाहिले जात आहे.