किल्ले रायगडावर पार पडली दुर्ग दुर्गेश्वर श्रीमान रायगड दुर्ग सफर व स्वच्छता मोहीम

902 0

किल्ले रायगडावर ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी या वर्षातील दुसरी मोहीम दुर्ग सफर व स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन, गडावरील छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ व जगदीश्वर महादेवाच्या मंदिर जवळील परिसर स्वच्छ करुन मोहिमेला सुरुवात करण्यात आली, होळी परिसर, बाजारपेठ, राजसदर आणि पायरी मार्ग येथील परिसरातील प्लास्टिक बॉटल गोळा करण्यात आल्या. या मोहिमेचा शेवट महा दरवाज्या जवळ करण्यात आला. या मोहिमेत गडावरील प्लास्टिक बॉटल गोळा करुन, त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.