मुंबई : ओबीसी आरक्षणाविरोधात (OBC Reservation) हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर 7 फेब्रुवारीला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. बाळासाहेब सराटे, प्रशांत भोसले आणि शिवाजी कवठेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. समाजाच्या टक्केवारीपेक्षा जास्त आरक्षण ओबीसींना देण्यात आलं आहे, राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना न करताच घटनाबाह्य आरक्षण देण्यात आल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
याचिकेत नेमकी काय करण्यात आली मागणी?
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असताना बाळासाहेब सराटे, प्रशांत भोसले आणि शिवाजी कवठेकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात एक याचिका दाखल केली आहे. ओबीसींना आरक्षण देण्याचा अध्यादेश 23 मार्च 1994 रोजी जारी करण्यात आला होता. त्याला आता उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करा, ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षण करा आणि तोपर्यंत घटनाबाह्य असलेल्या ओबीसी आरक्षणाला स्थगिती द्या अशी मागणी यामधून करण्यात आली आहे.
आरक्षणाचा कायदा रद्द करा
सन 1994 ला जीआर काढून ओबीसी आरक्षणात 16 टक्के वाढ करण्यात आली. ती घटनाबाह्य असल्याचे बाळासाहेब सराटे यांनी याचिकेत नमूद असल्याचे सांगितले. तो जीआर रद्द करणे आवश्यक असून जीआरचे कायद्यात रूपांतर करण्यात आले. 2001 चा कायदा 2004 ला पारित झाला होता. तो कायदा देखील रद्द करावा अशी मागणी बाळासाहेब सराटे यांनी केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Kondhwa News : कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू न केल्यास आपने दिला आंदोलनाचा इशारा
Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?
Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra News : महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर होणार मेळावे
Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं
Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी
Chhatrapati Sambhaji Nagar : माताच बनली वैरी ! 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ
Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर
Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन
Road Accident : भरधाव बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू
Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला