आता मराठी माणसाच्या…; महानगरपालिका निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भावूक पोस्ट

61 0

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले असून बहुतांश ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. प्रतिष्ठेची आणि अतिशय श्रीमंत अशी मानली जाणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही (BMC) भाजपच्या(BJP) पारड्यात पडली असून भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले आहेत.

बीएमसी निवडणुकीत(BMC)तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे (RAJ THACKERAY )आणि उद्धव ठाकरे (UDHAV THACKERAY) हे भाऊ एकत्र आले होते. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने (MNC) युती करत निवडणूक लढवली. मात्र या युतीला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपला 89 जागा, तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या असून महापौरपद भाजप शिंदे गटाकडे जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेना ठाकरे(SHIVSENA) गटाला 65 जागा मिळाल्या, तर मनसेला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले. मनसेला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही. इतर महापालिकांमध्येही मनसेची कामगिरी फारशी प्रभावी ठरलेली नाही.

या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे(RAJ THAKERAY) यांनी सोशल मीडियावर(SOCIAL MEDIA) प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची ही लढाई असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. हीच लढाई आपले अस्तित्व असल्याचे सांगत, काय चुकले, कुठे कमी पडले आणि पुढे काय करावे लागेल याचे सखोल विश्लेषण आणि आवश्यक कृती आपण सर्वजण मिळून करू, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

Share This News
error: Content is protected !!