नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू आहे. हे अधिवेशन दिवसेंदिवस वादळी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात विविध ठिकाणी ड्रग्जचे साठे जप्त करण्यात आले. ड्रग्जच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दुसरीकडे आज भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर भर सभागृहात गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. नितेश राणे यांच्या आरोपानंतर ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
काय घडले नेमके?
नितेश राणे यांनी अधिवेशनात एक फोटो दाखवला. हा फोटो शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा आहे. ते या फोटोत ज्या व्यक्तीसोबत दिसत आहे, त्याचं नाव सलीम कुत्ता असं आहे. सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्ब ब्लास्टमधील आरोपी असल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरे गटाचा पदाधिकारी बॉम्ब ब्लास्टमधील आरोपीसोबत डान्स करत आहे. हे प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नितेश राणे यांच्याकडून करण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘या’ योजनेद्वारे होणार लखपती
Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल