murlidhar mohol on pune metro

MURLIDHAR MOHOL : पुणेकरांची दिशाभूल? मोफत प्रवासाच्या घोषणांवर मोहोळांचा सवाल…

160 0

मेट्रो आणि पीएमपीएलचा ( PUNE METRO & PMPL)प्रवास मोफत करण्याची घोषणा ही जनहितासाठी नसून केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली असल्याचा आरोप केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ(MURLIDHAR MOHOL) यांनी केला आहे. शहरातील ‘मोफत सेवा’ योजनांचा पूर्वानुभव पाहता, ही घोषणा फसवी ठरण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

मोहोळ यांनी राष्ट्रवादीवर(NCP)टीका करताना बीआरटी सेवेच्या उदाहरणाचा उल्लेख केला. संगमवाडी विश्रांतवाडी बीआरटी(BRT) मार्ग सुरू करताना एक महिना मोफत सेवा देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच हा निर्णय बदलावा लागला आणि मोफत सेवेचा गाजावाजा फार काळ टिकू शकला नाही, असे ते म्हणाले.

अशा पार्श्वभूमीवर पुन्हा मेट्रो आणि पीएमपीएलसाठी(METRO & PMPL) मोफत प्रवासाची घोषणा करणे म्हणजे पुणेकरांची दिशाभूल करण्याचा आरोप त्यांनी केला. या घोषणांमागे आर्थिक तरतूद, व्यवस्थापन, तसेच सेवेच्या दर्जावर होणारे परिणाम यांचा कोणताही ठोस विचार केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीत पराभव अटळ दिसू लागल्याने राष्ट्रवादीकडून अशा प्रकारच्या ‘चुनावी जुमला’ जाहीर केले जात असल्याचा दावा मोहोळ यांनी केला.

Share This News
error: Content is protected !!