Mumbai Hoarding Collapse

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या ‘त्या’ होर्डिगबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

388 0

मुंबई : मुंबईला सोमवारी वादळाचा मोठा तडाखा बसला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान (Mumbai Hoarding Collapse) झाले आहे. या वादळाच्या तडाख्यात घाटकोपरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 100 लोक होर्डिगखाली अडकले होते. यातील 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान आता कोसळलेल्या होर्डिग बाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

होर्डिग बाबत ‘ही’ माहिती आली समोर
घाटकोपर येथे कोसळलेल्या या होर्डिगची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होती. हे होर्डिग रेल्वेच्या हद्दीमध्ये होतं, त्याला महापालिकेची परवानगी नव्हती. या अनधिकृत होर्डिगवरील जाहिराती दिसण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील झाडांवर देखील विषप्रयोग करण्यात आला होता. या प्रकरणी उद्यान विभागाच्या तक्रारीनंतर पंतनगर पोलिसांनी 24 फेब्रुवारीला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे होर्डिंग लावणाऱ्या एजन्सीला पालिकेनं नोटीस पाठवली आहे. पालिकेकडून कमाल 40 बाय 40 चौरस फुटांच्या होर्डिंगला परवानगी देण्यात येते. पण कोसळलेलं होर्डिंग 120 बाय 120 चौरस फुटांचं होतं. त्याचा एकूण आकार 15 हजार चौरस फूट इतका होता.

मुख्यमंत्र्यानी जाहीर केली मदत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटना झालेल्या ठिकाणची पाहणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींची भेट देखील घेतली. मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच जखमींचा सगळा खर्च सरकार करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Solapur Accident : सोलापूरमध्ये भीषण अपघात; 4 जण जखमी

Share This News
error: Content is protected !!