MUMBAI BLAST CASE 2006 : 2006 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्देश मुक्तता करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात आला (MUMBAI BLAST CASE 2006) असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि कोणती कारण सांगून न्यायालयाने हा निर्णय दिला पाहुयात…
PRASAD TAMDAR NEWS: प्रसाद तामदारचं सोशल मीडियावर “इमेज क्लिनिंग” अश्लील व्हिडिओ केले डिलीट
11जुलै 2006 साली संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी एक घटना घडली. माटुंगा ते मिरारोड स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमध्ये 11 मिनिटात 7 ठिकाणी बॉम्ब स्फोट झाले होते. या घटनेमध्ये तब्बल 209 प्रवाशांनी जीव गमावला होता तर 800 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले होते. मुंबईच्या इतिहासातला एक काळा अध्याय.. दोशींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षा तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती फाशीची शिक्षा सुनावलेल्या पाच जणांनी शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाने त्यांचा अपील मान्य केला फाशीची शिक्षा रद्द करू नये असा युक्तिवाद राज्य सरकारकडून करण्यात आला होता पण न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला आता मोठा दणका बसलाय. बारा दोशींपैकी एकाचा आधीच मृत्यू झालाय तर 11 जणांचा आता तुरुंग बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय.
आज कोर्टाने काय सांगितलं ?
आरोपींना फाशी द्यावी असे पुरावे समोर आलेले नाहीत असं कोर्टाचं म्हणणं होतं. साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत, स्फोटाच्या 100 दिवसानंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य असंही कोर्टाने म्हटलं. स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश, बॉम्बच माहित नाही तर मिळालेल्या बॉम्ब, बंदुका, नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही असं कोर्टानं म्हटलंय. बॉम्ब बंदुका नकाशे जुळून आले नाहीत असंही कोर्टाचं म्हणणं होतं. आणि हे सगळे मुद्दे पुढे ठेवत कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलीये.
केवळ 11 मिनिटात मुंबईतल्या विविध स्थानकांदरम्यान एकूण सात स्फोट झाले होते पाकिस्तानच्या लष्कर -ए- तोयबा संघटनेने हे स्पोर्ट घडवून आणले होते. या स्पोटांसाठी दहशतवाद्यांनी प्रेशर कुकर बॉम्ब चा वापर केला होता. त्यादिवशी मुंबईकर नेहमीप्रमाणे आपापल्या कार्यालयांमधून घरी जाण्यासाठी निघाले होते पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती. पहिला स्फोट ६ वाजून 24 मिनिटांनी झाला आणि शेवटचा स्फोट सहा वाजून 35 मिनिटांनी झाला. माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरीवली आणि मीरा रोड या स्थानकांत दरम्यान काही मिनिटांच्या अंतराने सात स्फोट झाले होते. हे स्फोट इतके शक्तिशाली होते की ट्रेनच्या डब्यांचा अक्षरशः चिंधड्या उडाल्या होत्या. अवघ्या 11 मिनिटात झालेल्या या ७ शक्तिशाली स्फोटांनी मुंबई हादरून गेली होती. या स्फोटानंतर मुंबईतील रेल्वे वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली होती आणि त्यानंतर झालेल्या तपासणीत काही स्फोट न झालेले कुकर बॉम्ब मिळाले होते. या स्फोटांची भीषणता इतकी जास्त होते की प्रवाशांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. सर्वत्र रक्ता मासांचा सडा पडला होता.
11 जुलै 2006… मुंबईच्या काळजात घातलेला तो दहशतीचा घाव आजही अनेकांच्या स्मरणात ताजा आहे. स्फोटांची ती साखळी, तो मृत्यूचा तांडव, आणि त्यानंतर सुरु झालेली वर्षानुवर्षे चाललेली न्यायालयीन लढाई, अखेर 19 वर्षांनी, न्यायालयाने निर्णय दिला. या निर्णयामुळे मात्र अनेकांना धक्का बसलाय.