Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana: सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी नवीन योजना सुरू केली आहे, जी त्यांचं आयुष्य बदलवणारी (Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana) ठरणार आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असून, तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विजेच्या तुटवड्यामुळे होणाऱ्या त्रासातून कायमची सुटका मिळणार आहे. लोडशेडिंग, वारंवार लाईट जाणे यामुळे पिकांना पाणी देण्यात येणाऱ्या अडथळ्यांना आता पूर्णविराम मिळणार आहे.
तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा सहप्रभारीपदी मुरलीधर मोहोळ
या योजनेअंतर्गत सर्वसामान्य शेतकऱ्यांना 90% अनुदान, तर अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना 95% पर्यंत अनुदान दिले जाईल. म्हणजे (Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana) अगदी कमी खर्चात शेतकरी सौर कृषी पंप खरेदी करू शकतील, जे शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोत वापरून सिंचनासाठी उपयोगी पडतील.
पात्रता:
ही योजना त्याच शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे, जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि ज्यांच्याकडे विहीर, बोरवेल, शेततळं (Mukhyamantri Solar Krushi Pump Yojana) अशा प्रकारचा पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे. याशिवाय त्यांनी महावितरणकडून आधीपासून वीज कनेक्शन घेतलेलं असणं आवश्यक आहे.
- 2 हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्यांना 3 HP क्षमतेचा पंप
- 2 हेक्टरपेक्षा अधिक शेती असणाऱ्यांना 5 HP क्षमतेचा पंप मिळेल.
फक्त एकाच पंपासाठी अनुदान मिळणार आहे.
PRADEEP SHARMA LIFE NEW MOVIE: प्रदीप शर्मांच्या जीवनावर येणार ‘अब तक 112 चित्रपट
अर्ज करण्याची प्रक्रिया:
शेतकऱ्यांनी offgridagsolarpump.mahadiscom.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. पंपाची क्षमता निवडून अर्जात आपली वैयक्तिक माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12, 8अ उतारा, रहिवासी दाखला, बँक पासबुक, फोटो यांची स्कॅन प्रत अपलोड करावी लागेल. अर्जाची स्थिती पाहून 5% किंवा 10% रक्कम भरावी लागेल. सबमिट केल्यावर अर्ज पूर्ण होईल.
ही योजना शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणारी एक मोठी संधी आहे.