महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केलीय.
राज ठाकरे यांनी यावेळी पुणे महापालिका निवडणुकीच्या अधिक लक्ष घातलं आहे. राज ठाकरे हे आजपासून पुणे दौऱ्यावर येत आहेत.मनसेचा वर्धापन दिन यंदा मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच होत आहे. उद्या पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे मनसेचा वर्धापन दिन होणार आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना वर्धापन दिन मध्ये संबोधित करणार आहेत.
राज्यभरातून मनसैनिक या वर्धापन दिनासाठी दाखल होणार आहेत. मनसे उद्या पुण्यात शक्तिप्रदर्शन करणार आहे. उद्या राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करून आपली महानगरपालिका निवडणुकीत काय भूमिका आहे हे स्पष्ट करणार आहेत.
राज ठाकरे यांच्या भाषणाकडे मन सैनिकांबरोबर राज्यातल्या जनतेचे पण लक्ष लागले आहे.