आम्ही काय मूर्ख आहोत का ? आमदार संजय शिरसाटांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका

789 0

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा 240 जागा तर शिंदेंची शिवसेना 48 जागा लढवेल असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यानंतर आता आमदार संजय शिरसाट यांनी चांगलीच आगपाखड केली आहे आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांना एवढे अधिकार कोणी दिलेले नाहीत. त्यांच्या या वक्तव्यात काहीच दम नाही, अशा शब्दात आमदार संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला 48 जागा तर भाजप 240 जागा असे गणित स्पष्ट केलं होते. त्यावर आम्ही काही मुर्ख आहोत का 48 जागा लढवायला? बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याला काही आधिकार नाही. बावनकुळे यांनी आतिउत्साहात केलेले ते वक्तव्य आहे.

दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा आणि शिवसेनेचा जागावाटपाचा कोणताही फॉर्मुला ठरला नसल्याचं सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Share This News
error: Content is protected !!