PANKAJA MUNDE:परळीबाबत मंत्री पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या…

620 0

पंकजा मुंडे (PANKAJA MUNDE)यांनी परळी(PARALI)मतदारसंघासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. परळीची जबाबदारी आता धनंजय मुंडे (DHANAJAY MUNDE)यांच्याकडे असून, परळी(PARALI) धनुभाऊंना सोपवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याचबरोबर, आगामी काळात माळाकोळी मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

“मी माळाकोळी(MALAKOLI) सांभाळेन,” असं स्पष्ट सांगत पंकजा मुंडे(PANAKAJA MUNDE) म्हणाल्या की, दिवंगत गोपीनाथ मुंडे(GOPINATH MUNDE) यांचं माळाकोळीवर(MALAKOLI) विशेष प्रेम होतं. त्यांनी दिलेल्या शब्दामुळेच माळाकोळीची पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊ शकली, असंही त्यांनी नमूद केलं. परळीइतकंच माळाकोळीवरही प्रेम असल्याचं त्यांनी सांगितलं.

पंकजा मुंडेंच्या(PANKAJA MUNDE) या वक्तव्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार का हे पाहणं महत्वाचं असेल

Share This News
error: Content is protected !!