Medha Kulkarni controversy

Medha Kulkarni controversy : खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर कारवाईची मागणी, अजान रोखण्याचा आरोप

701 0

Medha Kulkarni controversy : पुणे : खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. हनुमान जयंती निमित्त पुण्येश्वर मंदिरातील कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. यांनी मस्जिदीत घुसुन गोंधळ करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला आहे. यावेळी ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यात नमाजासाठी दिली जाणारी अजान रोखण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. (Medha Kulkarni controversy)

मोठी बातमी! गुगल करणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

या संपूर्ण घटनेनंतर ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
या घटनेनंतर नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय आहे. हा मुद्दा आणि परिसर अत्यंत संवेदनशील असून, खासदारांनी अशा प्रकारे व्यक्त होणे चुकीचे आहे. केवळ आपण अधिक कट्टरतावादी असल्याचे दाखवून वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा हा प्रयत्न आहे,” अशी टीका डंबाळे यांनी केली. (Medha Kulkarni controversy)

TOP NEWS MARATHI LIVE | MPSC परीक्षा पुढे ढकलावी; आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी भूमिकेवर ठाम; तोडगा निघणार का? LIVE

“हा संपूर्ण प्रकार धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देणारा असून, यामुळे शहराची शांतता धोक्यात येत आहे. खासदार कुलकर्णी यांना जे काही आक्षेपार्ह वाटत असेल, त्याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी केवळ स्टंटबाजी करून दंगलसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी,” अशी मागणी राहुल डंबाळे यांनी सरकारकडे केली आहे. (Medha Kulkarni controversy)

पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मेधा कुलकर्णी यांनी स्थानिक मुस्लिम नागरिकांना धक्काबुक्की केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा विषयी चिथावणी देणारी विधानं केली होती, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्यामुळे आता मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय.

Share This News
error: Content is protected !!