शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरांना मातृशोक

265 0

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे सहकारी असलेले आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले.

 

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार,माजी मंत्री बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आदी नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन रेसिडेंन्सी डेक्कन, खार दांडा रोड, वांद्रे पश्चिम, पाली हिल येथील घरी  दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घेता येणार आहे.

त्यानंतर सांताक्रुज पश्चिम येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide