‘चंद्रमुखी’ चित्रपटाचं प्रियंका चोप्राने केलं कौतुक ! नेमकं काय म्हणाली प्रियंका वाचा…

308 0

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने ‘चंद्रमुखी ’ चित्रपटाचे तिने कौतुक केले आहे.

प्रियंका चोप्रा नेहेमी बॉलिवूड चित्रपटावर भाष्य करताना दिसते. परंतु, चक्क तिने मराठी चित्रपटाविषयी आपले मत मांडले आहे. विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित असलेला ‘चंद्रमुखी ’ चित्रपटाचे तिने कौतुक केले आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रियंका चोप्राने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करून सर्व टीमचं अभिनंदन केलं.

‘चंद्रमुखी’ चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होणार असून सध्या हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे. त्यात प्रियंका चोप्राने सुद्धा या चित्रपटाची स्तुती करत प्रेक्षकांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा असं म्हटलं आहे. चंद्रमुखी चित्रपटात प्रमुख भूमिकेत अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे दिसणार आहेत. चित्रपटातील गाणी प्रसिद्ध झाली असून त्यामधील दोन लावण्यांना चाहते भरभरून पसंती देत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!