छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अखेर लायकी हा शब्द मागे घेतला आहे. पुण्यातील खराडीत झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी लायकी या शब्दाचा वापर करत जोरदार टीका केली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सध्या मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे. मात्र, आता मनोज जरांगे बॅकफूटवर आले आहेत. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर लायकी शब्द मागे घेतोय, असे म्हणत जरांगेंनी लायकी शब्द मागे घेतला आहे.
नेमके काय म्हणाले होते मनोज जरांगे?
मराठा आरक्षण मुद्यावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळांमध्ये रंगलेल्या वादाला नवं वळण लागलं आहे. आरक्षणाअभावी मराठ्यांना लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागत असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता.
वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला
आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. शिक्षण खूप घेऊन तो झेंडा पकडतो, तो बेरोजगार होतो, यासाठी मी लायकीवर बोललो होतो. (लायकीवर) मी त्यावर काय चूक बोललो, आमच्या लोकांचे हाल झाले, मी बोललो त्यात काही लायकीचा संदर्भ येत नाही, लायकी शब्दाला जातीय रंग दिला. तुम्ही हुतात्मा स्मारक गोमूत्राने धुतला. लायकीच्या वक्तव्यावरून जरांगे काहीसे बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय. तर छगन भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंना याच मुद्यावरून डिवचलंय. जरांगे भुजबळ वादात सत्ताधारी तसेच विरोधकांनीही सावध पवित्रा घेतला आहे. भविष्यात हा वाद अजून चिघळण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Hingoli News : राजू शेतात जाऊन येतो; म्हणत घरातून गेला मात्र माघारी परतलाच नाही
Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल
Accident News : कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू
Filmfare OTT Awards 2023 : ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023’ जाहीर