Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली

4472 6

जालना : जालना जिल्ह्यातून (Maratha Reservation) एक मोठी बातमी समोर आली आहे. जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. तिर्थपुरी गावात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास अंबड येथून रामसगावकडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या या बसला आडवून अज्ञातांनी पेटवून दिले. यावेळी बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या. या घटनेनंतर जालना पोलिस अधीक्षक यांनी एसटी महामंडळाची वाहतूक तात्पुरती थांबवली.

काय घडले नेमके?
राज्य परिवहन मंडळाच्या अंबड आगाराचे बस क्र.1822 अंबड- रामसगाव मुक्काम करून परत येत होती. यावेळी सकाळी 06.30 ते 07.00 वाजे दरम्यान तीर्थपुरी या गावात मराठा आरक्षण आंदोलकांनी दगडफेक करून दर्शनीय काच फोडली यानंतर आंदोलकांनी अधिक आक्रमक होत बस पेटवून दिली. या घटनेबाबत आगार व्यवस्थापक यांच्याकडून पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

एसटी सेवा बंद
जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आल्याने राज्य परिवहन मंडळाकडून खबरदारी म्हणून एसटी बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे परिवहन मंडळाने जिल्ह्यातील 5 आगरांच्या बस बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. पोलिसांचे पुढील आदेश येईपर्यंत ही बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!