Manoj Jarange

Manoj Jarange Patil : 20 फेब्रुवारीपर्यंत सगेसोयरेची अंमलबजावणी न झाल्यास…; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

648 0

जालना : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज 9 वा दिवस आहे. अंतरवाली सराटीत ते उपोषणाला बसले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. 20 तारखेपर्यंत सगेसोयरेची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसं केलं नाही तर आमच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?
20 फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन आहे. यात मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना सगेसोयरे म्हणून आरक्षण द्यावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यासाठी त्यांचं उपोषण सुरू आहे. सरकारने तशी अधिसूचना काढून कायद्याने आरक्षण देऊ असं कबूल केलं आहे.

20 फेब्रुवारीला अधिवेशनात याची अंमलबजावणी होते की नाही ते पाहणार. जर अंमलबजावणी नाही झाली तर अधिवेशनाच्या वेळेनुसार आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. म्हणजे अधिवेशन लवकर संपलं तर 20 तारखेलाच उशिरा संपलं तर 21 तारखेला आम्ही आमच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Supriya Sule : ‘हा भातुकलीचा खेळ नाही’; बारामतीच्या लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघात ! चौघांचा मृत्यू तर 10 जण जखमी

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide