sharad pawar & raut

राज्यसभा उमेदवारीवर मोठा ट्विस्ट; शरद पवारांसाठी ठाकरे गटाचा उघड पाठिंबा

63 0

 

येत्या 2 एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार (SHARAD PAWAR)यांची राज्यसभेची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत संभ्रम निर्माण झाला असतानाच, या चर्चांना आता एक महत्त्वाचा राजकीय ट्विस्ट मिळाला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(SANJAY RAUT)  यांनी शरद पवार यांच्या संभाव्य राज्यसभा उमेदवारीवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. पवार साहेबांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. अंतिम निर्णय मात्र शरद पवार(SHARAD PAWAR) यांनीच घ्यायचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (SANJAY RAUT)म्हणाले की, शरद पवार (SHARAD PAWAR) यांच्या नेतृत्वाखालील मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. पवारांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ नेता दिल्लीत असणं महाराष्ट्रासाठी अत्यावश्यक आहे. या संदर्भात आपण स्वतः अनेकदा पवार साहेबांशी चर्चा केली असून, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतही हा विषय मांडल्याचे राऊत यांनी सांगितले.

पवार साहेबांची थांबण्याची मानसिकता असली, तरी ते महाविकास आघाडीसाठी आणि महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक असल्याचे राऊत म्हणाले. “तुमच्यासारखा नेता दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज संसदेत असणं,” असं आपण पवारांना स्पष्टपणे सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.

राज्यसभेच्या गणितावर बोलताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीकडे पवार साहेबांना निवडून आणण्यासाठी पुरेशीच नव्हे, तर कोट्यापेक्षा अधिक मते आहेत. त्यामुळे शरद पवारांसारख्या (SHARAD PAWAR)नेत्याला कुणापुढे हात पसरायची गरज नाही. फडणवीस किंवा इतरांकडून कितीही अपशकून झाला, विशेषतः दिल्लीतून नकारात्मक संकेत दिले गेले, तरी ते यशस्वी होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या घडामोडींमुळे शरद पवार(SHARAD PAWAR) राज्यसभेची निवडणूक लढवणार का, याकडे आता केवळ महाराष्ट्राचं नव्हे, तर देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Share This News
error: Content is protected !!