घाटकोपर येथील मनसे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली यांना भोंगे लावल्याप्रकरणी अटक

500 0

मुंबई- घाटकोपर येथील मनसेचे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली यांना अटक करण्यात आली आहे. भानुशाली यांच्या कार्यालयातून पोलिसांनी भोंगे जप्त केले आहेत.

मनसेतर्फे राज्यभर उद्या आंदोलन आणि महाआरती करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

घाटकोपरमधील चांदिवली येथील भानुशाली यांच्या कार्यालयाबाहेरील झाडावर बेकायदेशीरपणे भोंगे लावण्यात आले होते. याबाबत पोलिसांनी त्यांना भोंगे काढण्याबाबात सुचना दिल्या होत्या. परंतु भोंगे उतरविण्यात आले नाहीत. अखेर पोलिसांनी कारवाई करत भोंगे काढून जप्त केले आहेत. तसेच भानुशाली यांना ताब्यात घेतले आहे.

भानुशाली हे चांदिवली मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. राज ठाकरेंनी सांगिल्याप्रमाणे त्यांनी सर्वप्रथम भोंग्यांवर हनुमान चालिसा लावली होती. पोलिसांनी कारवाई दरम्यान त्यांच्याकडील काही भोंगे घेतले ताब्यात घेतले आहेत. लाऊडस्पीकरवर ‘हनुमान चालीसा’ लावण्यासाठी परवानगी घेतली नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस कारवाई झाली तरी लवकरच सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरवर ‘जय श्रीराम’ ऐकवणार असे महेंद्र भानुशाली म्हणाले.

दरम्यान, मनसेचे उद्यापासूनचे आंदोलन नेमकं कशा स्वरुपाचे असेल याबद्दल अद्याप मनसेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, सकाळी पहिल्या अजानपासून मनसे मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसाचे पठन करून आंदोलनाची सुरुवात करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!