Breaking News
Maharashtra Weather

Maharashtra Weather : ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका; ‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट

666 0

मुंबई : हवामान विभागाच्या (Maharashtra Weather) माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यात या ठिकाणी पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला येथे वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात धडकलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची योग्य काळजी घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Share This News
error: Content is protected !!