मुंबई : महाराष्ट्रावर अजूनही अवकाळी पावसाचे (Weather Update) ढग कायम आहेत. आज आणि उद्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तास खूप महत्वाचे असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर याउलट काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ भागात कोसळणार अवकाळी पाऊस
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
या आठवड्यात अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.