Maharashtra Weather

Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

585 0

हवामान विभागाच्या (Maharashtra Weather Alert) पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या वातावरणाच्या खालच्या थरात असणारी द्रोणिकारेषा तामिळनाडूच्या दक्षिणेुपासून मध्य प्रदेशापर्यंत जात आहे. पुढं हीच रेषा विदर्भातूनही जात असल्यामुळं राज्यातील हवामान कोरडं राहणार आहे. तर, हवेच्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसणार आहे.

हवामानातील या बदलांमुळं सध्या अवकाळीला पोषक वातावरण तयार होत असून, धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढं 6 ते 8 एप्रिलदरम्यान मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. पण हा पाऊस मध्यम स्वरुपाचा असणार आहे.

आठवड्याअखेरीस राज्यातील नाशिक, जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी असेल. तर, पुढच्या 48 तासांमध्ये पुण्यासह नजीकच्या भागांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून, निवडक भागांवर ढगांचं सावट पाहायला मिळणार आहे. पुढच्या 24 तासांमध्ये या भागांसह यवतमाळ, नागपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मालेगाव, सोलापुरमध्ये असेच चित्र पहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI : निवडणुकीच्या तोंडावर RBI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Siddhasana : सिद्धासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!