Navneet Rana And Uddhav Thakery

ठाकरे गटाचा मास्टरप्लॅन ! नवनीत राणांविरोधात लोकसभा लढवणार ‘ही’ वाघीण?

695 0

मुंबई : आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत प्रामुख्याने 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आणि अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर आपला उमेदवार निवडून आणण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) किंवा विधान परिषदेवरील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) विरुद्ध एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. तर सुषमा अंधारेंना (Sushma Andhare) अमरावतीतून रिंगणात उतरवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न असणार आहे. शिवसेनेने 2019 मध्ये जिंकलेल्या 18 लोकसभा मतदारसंघांसोबतच, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातही शिवसेना ठाकरे गट आक्रमकपणे निवडणूक लढणार आहे.

छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार MIM चे इम्तियाज जलिल (Imtiaz Jalil) आहेत. तर अमरावती लोकसभा मतदार संघात अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) विद्यमान खासदार आहेत.

Share This News

Related Post

Devendra Fadnavis : ‘समृद्धी’नंतर मराठवाड्याच्या समृद्धीचा महामार्ग; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Posted by - August 27, 2023 0
परभणी : परभणीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

सिंहगड रोड परिसरात पुन्हा एकदा थरार ; टोळक्याकडून एकाचा खून

Posted by - October 1, 2022 0
पुणे : सिंहगड रोड परिसरातील न-हे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली.…
Pune News

Acharya Atre : आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दीत्तोतर रौप्य महोत्सवी वर्ष पुणे महानगरपालिकेने साजरे करावे

Posted by - July 27, 2023 0
पुणे : साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या (Acharya Atre) जन्मशताब्दीतोत्तर जन्म रौप्य महोत्सवी वर्ष यंदा 13ऑगस्ट रोजी सुरु होत आहे.त्या…

कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसवर पुन्हा दगडफेक; परिसरातील वातावरण तापले

Posted by - December 22, 2022 0
कर्नाटक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात सीमा भागातील मराठी भाषकांवर कन्नडगांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी…
ISRO

इस्रोतर्फे नॅविगेशन सॅटेलाईटचे यशस्वी लाँचिंग; आता भारताला जगावर लक्ष ठेवता येणार

Posted by - May 29, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) सोमवारी (29 मे) रोजी जीपीएस प्रणालीच्या (GPS) सेवेमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *