Suraj Chavan

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

979 0

मुंबई : कथित खिचडी घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत. त्याची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंच्या अगदी जवळचा नेता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अडचणीत येणार का अशी कुजबुज सुरू झाली आहे.

कथित खिचडी घोटाळा प्रकरणील आरोपी सूरज चव्हाण यांची मालमत्ता, ईडीनं केली जप्त केली आहे. कोव्हिड काळात BMC खिचडी वाटप घोटाळा झाला होता. मुंबई इथल्या निवासी फ्लॅट आणि जिल्हा-रत्नागिरी येथील शेतजमिन अशी 88.51 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. उद्धव ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर, संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची देखील ईडीकडून चौकशी होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!