MAHADEO MUNDE CASE : बीडच्या परळी मधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येला तब्बल 18 महिने उलटले मात्र यातील आरोपी अजूनही मोकाटच आहेत. याच प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज दुपारी विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा (MAHADEO MUNDE CASE )प्रयत्न केला.
परळी मधील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज 16 जुलै रोजी आपल्या कुटुंबासमवेत पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेर आत्मदाहनाचा (MAHADEO MUNDE CASE ) सुरुवातीला प्रयत्न केला. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या जवळच्या दोन पेट्रोलच्या बाटल्या जप्त करण्यात आलया. यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ज्ञानेश्वरी मुंडे आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट सुद्धा झाली. त्यानंतर मात्र न्याय मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्याचे घटना घडली. त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना तातडीने तेथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बॉटलमध्ये नेमकं कुठलं औषध होतं याची माहिती नाही. इमर्जन्सी वॉर्ड मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू. ज्ञानेश्वरी मुंडेंना अति दक्षता विभागात हलवण्याची शक्यता.व्यक्त केली जात असून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचाराला सुरुवात करण्यात आल्याचीही माहिती आहे. बीड मधील परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृण हत्येला 18 महिने उलटले तरी अद्याप या प्रकरणातील आरोपी मोकाट आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे न्यायासाठी एसपी ऑफिसचे उंबरे झिजवत आहेत. मात्र या प्रकरणाच्या चौकशीला वेग आलेला नाही. शेवटी हातबल होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला. या प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट केलं असून खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना न्यायासाठी व्यवस्थेचे उंबरे झिजवावे लागतात आणि शेवटी हतबल होऊन आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो ही बाब अतिशय चिंताजनक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
PUNE PORSCHE CASE UPDATE: पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींवर अल्पवयीन म्हणूनच खटला चालणार
सध्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खुनासारख्या मोठ्या प्रकरणातही तब्बल 18 महिने झाले तरी आरोपीला अटक होत नाही. न्याय मिळण्यासाठी आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलावं लागतं ही खरंच दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.