Mahavikas Aghadi

Maharashtra Politics : मविआचा फॉर्म्युला ठरला पण ‘त्या’ 7 जागांचा सस्पेन्स कायम

651 0

अनेक दिवसापासून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा (Maharashtra Politics) वाटपाचा तेव्हा सुटत नसल्याचे दिसून येत होतं. मात्र आज अखेर हा तिढा सुटलेला आहे. महाविकास आघाडीचा 48 जागांचा फॉर्म्युला ठरला. सर्वाधिक म्हणजेच 21 जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार आहेत. तर काँग्रेसला 17 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दहा जागा मिळणार आहेत. मात्र यात काही अशाही जागा आहेत ज्या जागांवरचे उमेदवार अजूनही ठरलेले नाहीत. पाहूया कोणते आहेत हे सात मतदारसंघ

माढा
या जागेसाठी भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाच्या पारड्यात पडली आहे. मात्र उमेदवार अद्यापही ठरलेला नाही. निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेले भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील हे बंडखोरी करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळू शकते. तर डॉ. अनिकेत देशमुख हे सुद्धा इच्छुक असून त्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. आता या दोघांपैकी कोणाचे नाव निश्चित होणार हे पुढच्या दोन-तीन दिवसात कळेल.

रावेर
रावेर मधून भाजपने रक्षा खडसे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र सुनेच्या विरोधात निवडणूक लढवण्यास किंवा प्रचार करण्यास खडसेंनी नकार देत पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या या जागेवर रवींद्र पाटील, श्रीराम पाटील यांच्यासह आणखी दोन पदाधिकारी इच्छुक आहेत. मात्र अंतिम निर्णय शरद पवारांच्या हातात आहे.

मुंबई उत्तर मतदार संघ
या मतदारसंघात उत्तर भारतीय मतदार जास्त असल्यामुळे भाजपने नवा डाव आपला आहे. भाजपने या जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. तरीही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडीला या जागेसाठी योग्य उमेदवार मिळालेला नाही. या मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर या 2019 च्या निवडणुकीत उभ्या होत्या. मात्र त्यांचा पराभव झाला आणि आता सुद्धा या मतदारसंघातून एखाद्या सिने अभिनेत्रीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई उत्तर मध्य
या मतदारसंघासाठी महायुतीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे दोन्ही पक्ष या जागेवर दावा सांगत आहेत. तर महाविकास आघाडीकडूनही उमेदवार निश्चित झालेला नाही. या जागेवर अभिनेते राज बब्बर, नसीम खान, अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या नावांची चर्चा आहे.

सातारा
साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला, त्यामुळे पवारांच्या विश्वासातला हक्काचा एक उमेदवार कमी झाला. महायुतीकडून या जागी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीचा उमेदवार शोधण्याचे काम चालू आहे. तर शशिकांत शिंदे यांना या जागी उमेदवारी मिळू शकते अशी सूत्रांची माहिती आहे.

जालना
जालना हा भाजपचा बालेकिल्ला आहे. रावसाहेब दानवे हे या जागेवरून तब्बल पाच वेळा विजयी झालेले आहेत. पुन्हा एकदा भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या तोडीचा उमेदवार काँग्रेसला सध्या मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कल्याण काळे यांच्या नावाचा विचार सुरू आहे. मात्र अद्याप नाव निश्चित झालेले नाही.

उमेदवार निश्चित न झालेली अखेरची जागा आहे धुळ्याची
या जागेवर देखील भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिकीट दिलं आहे. काँग्रेसकडून मात्र उमेदवार निश्चित झाला नसून आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे या दोन महिला उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. त्याचबरोबर धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे या उमेदवारांबाबत देखील चाचपणी सुरू आहे.

48 जागांच्या फॉर्म्युलानुसार शिवसेना ठाकरेकटाने सर्व 21 उमेदवार जाहीर केले आहेत. तर काँग्रेसचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार जाहीर करणे अद्याप बाकी आहे. या आठवड्यामध्ये हे सातही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. या उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतरच लोकसभेचे चित्र एकंदरीत स्पष्ट होईल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : साहेबांना आणि मुलीला मतदान केलं आता सुनेला मतदान करा; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन

Virar News : गुडीपाढव्याच्या दिवशी 4 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Politics : सांगली शिवसेनेच्याचं पारड्यात, स्थानिक काँग्रेस नाराज; विश्वजीत कदम, विशाल पाटील नॉटरीचेबल

RBI: महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ने केली कारवाई, खात्यातून पैसे काढण्यावर ग्राहकांना बंदी

Maharashtra Premier League 2024 : KKR चा माजी अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे, अनिकेत पोरवाल कोल्हापूर टस्कर्सच्या ताफ्यात

अखेर महाविकास आघाडीतील सांगली भिवंडीच्या जागेचा तिढा सुटला; पहा कोणता पक्ष लढणार कोणती जागा?

Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हाय अलर्ट

Downward Dog Pose : अधोमुख श्वानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!