Kolhapur News

Kolhapur News : के आय टी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून मतदार जनजागृती विषयी पथनाट्य सादर

544 0

कोल्हापूर : मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Kolhapur News) रा से यो च्या स्वयंसेवकांनी शिवाजी विद्यापीठामध्ये ‘मतदार राजा जागा हो ‘ हे पथनाट्य सादर केले. विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात मुख्य निवडणुक अधिकारी श्री. श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये पथनाट्यआयोजित करण्यात आले होते.

या पथनाट्याचा मुख्य हेतू, मतदानाचा टक्का वाढवणे व तरुणांमध्ये या विषयी विशेष जनजागृती करणे हा आहे. एकूणच सर्वोतोपरी योग्य मांडणी तसेच उत्तम सादरीकरण यामुळे उपस्थित आणि प्रमुखाकडून के आय टी कॉलेजच्या विद्यार्थी संघाचे भरभरून कौतुक झाले. या आधीही याचे शिवजयंती निमित्त दि.19 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदिर, बिंदू चौक, रंकाळा तलाव व उद्यान परिसर येथे प्रयोग करून स्वयंसेवकांनी समाज प्रबोधनाचे काम हाती घेतले आहे. यासाठी देखील पथनाट्यातील सर्वच विद्यार्थ्यांवर प्रेक्षक व प्रमुख उपस्थितांच्या कौतुकाचा वर्षाव झाला.

या पथनाट्याच्या सादरीकरणावेळी मुख्य निवडणुक अधिकारी श्री. श्रीकांत देशपांडे, डॉ. पी. एस. पाटील,तानाजी चौगुले हे उपस्थीत होते. तसेच या पथनाट्यासाठी के आय टी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या डॉ. श्रीनिवास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले व या पथनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन प्रा.शिवप्रसाद माजगांवकर यांनी केले. यामध्ये कलाकार म्हणून वेदेश हिरेमठ, प्रथमेश गाजरे, आर्या पाटील, श्रेया जाधव, श्रावणी सुतार, आशिष गेजगे, सागरिका काळे, श्रावणी तोडकर, श्रुती दीक्षांत, संकेत भारती, निकिता ठोंबरे, निखील सोळखे, शर्वरी कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Palghar News : 17 विद्यार्थिनीसाठी पाणी ठरलं विष; ‘ती’ चूक पडली महागात

Yogesh Sawant : योगेश सावंत यांना मुंबईतून अटक

Nitesh Rane : संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा; नितेश राणेंची मागणी

Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीनंतर आता ‘या’ पक्षाकडून जरांगे पाटलांना लोकसभेची ऑफर

Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश

IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?

Jamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 2 ठार, अनेक जण जखमी

Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी

Mumbai News : खळबळजनक ! चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले

Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा

Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!