Kokanvasi Maratha Samaj Pune: कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिपरी चिंचवड चा वर्धापन दिन कार्यक्रम उद्यान मंगल कार्यालय, (Kokanvasi Maratha Samaj Pune) सदाशिव पेठ पुणे – 411030 या ठिकाणी दिनांक 05-10-2025 रोजी जल्लोषात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोकणातील पारंपरिक जागडी नृत्यकला सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथम दीपप्रज्वलन व शिव प्रतिमेला पुष्पहार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. श्री कैलास कदम कामगार नेते, संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष कृष्णा मोरे, संस्थेचे संस्थापक श्री वसंतराव मोरे आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर सर्वप्रथम प्रमुख पाहुणे, संस्थेचे अध्यक्ष आणि मंचावरील जेष्ठ मार्गदर्शक यांचा सन्मान करण्यात आला आणि पुढील मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सुरवातीला संस्थेने वर्षभरातील राबवलेले विविध उपक्रम याबाबत संस्थेचे सचिव श्री. रमेश मोरे यांनी थोडक्यात समाज बांधवाना माहिती दिली.
त्यानंतर समाजातील विविध मान्यवर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्काराचे मानकरी खालील प्रमाणे –
सामाजिक क्षेत्र श्री. कृष्णा कदम, श्री. सूर्यकांत मोरे, श्री. वसंत चव्हाण, श्री. अप्पाजी मोरे, श्री.रविंद्र मोरे, सैनिकी क्षेत्र- कॅ रमेश सकपाळ, शैक्षणिक क्षेत्र – सौ मनीषा राजेंद्र (Kokanvasi Maratha Samaj Pune) चव्हाण, कला क्षेत्र – श्री. मोहन जाधव, औद्योगिक क्षेत्र – श्री मोहन मोरे व श्री. गोपाळ मोरे, क्रीडा क्षेत्र – प्रसाद शिंदे, वैद्यकीय क्षेत्र – श्री. दिपक मोरे, कृषी क्षेत्र- श्री.दिपक शिंदे, पोलीस दल – श्री. भरत मोरे.
SANTOSH BANGAR VISIT: संतोष बांगर स्वतः ट्रॅक्टर चालवत पोहोचले शेतात: पाहा नेमकं कारण काय ?
या नंतर प्रमुख पाहुणे डॉ. श्री कैलास कदम यांनी समाजाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. प्रामुख्याने समाज एकसंघ राहील, समाजातील मुले / मुली IAS/IRS व्हावीत (Kokanvasi Maratha Samaj Pune) या करता समाजाने प्रयत्न केले पाहिजेत आणि समाज विकासासाठी मी स्वतः कटिबद्ध आहे आणि राहील असे सांगितले.
त्यानंतर विविध सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी तसेच जेष्ठ मार्गदर्शक यांचा सत्कार करण्यात आला.
VIJAY WADDETIWAR ON HAIDRABAD GADGET: ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी लढत राहणार
त्यानंतर समाजातील 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी ( समाजाचे उद्याचे भविष्य) यांचा सत्कार उच्च शिक्षित विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आला. वेळे अभावी मान्यवर यांना आपले मनोगत व्यक्त करता आले नाही, त्या बाबत सर्व पदाधिकारी यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष कृष्णा मोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आणि राष्ट्रगीत घेण्यात आले आणि शेवटी सर्व समाज बांधव यांनी सुरूची-भोजन घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष श्री दत्ता जाधव, उपाध्यक्ष श्री अनिल मोरे, कार्याध्यक्ष श्री राजेंद्र सोंडकर, सह सचिव संजय सकपाळ, खजिनदार सचिन मोरे, श्री दत्ता मोरे (गुरुजी) संपर्कप्रमुख श्री विनोद चव्हाण, श्री संदिप सावंत, श्री संदिप चव्हाण, श्री कृष्णा जाधव, श्री अनिल गणपत मोरे, श्री मंगेश शिंदे, श्री रविन्द्र मोरे, श्री महेंद्र कदम, श्री महेश जाधव, श्री राजन जाधव, श्री नंदू चव्हाण, श्री राजेश शिंदे, श्री संतोष भोसले, श्री समीर हळदे,श्री बाळासाहेब मोरे श्री. महेंद्र जाधव, श्री ज्ञानेश्वर कदम आणि सर्व विभागीय अध्यक्ष, सभासद यांनी विशेष मेहनत घेतली तसेच समाजातील सर्व जेष्ठ मार्गदर्शक श्री प्रकाश मोरे, श्री रामचंद्र मोरे, श्री रघुनाथ शिंदे, श्री सुहास मोरे, श्री भरत मोरे, श्री अनिल सकपाळ यांनी सुद्धा चांगले मार्गदर्शन केले.
आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक गुहागरचे वार्ताहार आणि आमचे सहकारी श्री सुदर्शन जाधव यांनी केले.