मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि लांब पल्ल्याचा फिनिक्युलर रोपवे (Ropeway) महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार आहे. कल्याण मध्ये स्थित असलेल्या मलंगगडावर जाण्यासाठी ही रोप वे सुरु करण्यात येणार आहे. फिनिक्युलर रोपवेची टेस्टिंग सुरू असून याचे काम अतिम टप्प्यात आलेलं आहे. मे महिन्यात ही फिनिक्युलर रोप वे सेवा प्रवाशांसाठी खुली होणार आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर जाण्यासाठी देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फिनिक्युलर रोपवे उभारण्याचे काम चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून फिनिक्युलर रोपवेची टेस्टिंग सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी फिनिक्युलर रोपवेच्या कामाची पाहणी केली आहे. या फिनिक्युलर रोपवेच्या उभारणी साठी तब्बल 200 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबवण्यात आलेला आहे.
फिनिक्युलर रोपवेच्या कामाला प्रत्यक्षात 2012 मध्ये सुरुवात झाली होती. काही कारणांमुळे अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत होता. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पांना पुन्हा नवसंजीवनी देऊन नव्या ठेकेदाराची नेमणूक करून या कामाला गती दिली. गेल्या वर्षभरापासून या फिनिक्स रोपेचे काम जोरदार सुरु आहे. 90 टक्के हे काम संपूर्ण झालं आहे. ज्या फिनिक्युलर रोपवेची चाचणी सुरू आहे त्या फ्युनिक्युलरमध्ये बसून आमदार किसन कथोरे यांनी अधिकाऱ्यांसह गडावर जाऊन कामाचा आढावा घेतला. गडावर असलेल्या स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे.डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या वतीनं 24 फेब्रुवारीला मलंगड यात्रा सुरू होणार असून मुख्यमंत्री शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आनंद दिघेंनी मलंगगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि ही चळवळ चालू राहावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Beed Crime : शरद पवार गटाच्या नेत्याची पेट्रोल टाकून गाडी जाळली; Video आला समोर
Ind Vs Eng : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास; इंग्लंडविरुद्ध केले ‘हे’ ‘अनोखं शतक’
Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक
Lasya Nandita : धक्कादायक ! भीषण अपघातात ‘या’ तरुण महिला आमदाराचा मृत्यू
Rajendra Patni : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन