महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, तळघर आणि कार्यालय आदी कामांच्या नूतनीकरणाचा शुभारंभ मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि राजीव बर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, वास्तूदेखभाल कार्यवाह प्रमोद आडकर, कार्यवाह दीपक करंदीकर, बंडा जोशी, उद्धव कानडे, माधव राजगुरू, वि. दा. पिंगळे, शिरीष चिटणीस, डॉ. सतीश देसाई आणि वास्तुविशारद माधव हुंडेकर, आरती मोर्वेकर उपस्थित होते.
डॉ. शिवाजीराव कदम आणि डॉ. पी. डी. पाटील यांच्या पुढाकाराने हे नूतनीकरणाचे काम सुरु झाले असून मे २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह वातानुकूलित तसेच ध्वनिप्रतिबंधित करण्यात येणार असून त्याची आसन क्षमताही वाढणार आहे. तसेच उत्तम दर्जाची ध्वनिव्यवस्था सभागृहात करण्यात येणार आहे, त्यामुळे रसिकांची अधिक चांगली सोय होणार आहे. या कामाबरोबर तळघराचे आणि मसापच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या नूतनीकरणामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वास्तूला नवी झळाळी प्राप्त होईल.’असं मत व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे.