दुर्गदुर्गेश्वरावर शिवभक्तांची गर्दी; सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगली शिवजयंती
दुर्गदुर्गेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवनेरी (SHIVANERI) किल्ल्यावर शिवजयंतीचा(SHIVAJYANTI) भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित या शासकीय कार्यक्रमात सांस्कृतिक तसेच साहसी खेळांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले.
ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर लहान मुलांनी छत्रपतींना मानवंदना अर्पण केली. चिमुकल्या मावळ्यांनी साकारलेला शिवकालीन पराक्रम प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरला. या सादरीकरणातून शिवचरित्रातील शौर्य आणि प्रेरणा जिवंत करण्यात आली.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( DEVENDRA FADNAVIS)उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (SUNETRA PAWAR), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. अभिनेते रितेश देशमुख( RITESH DESHMUKH) यांनीही कार्यक्रमाला विशेष हजेरी लावली.
राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल झाले होते. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा( CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ)जन्म झाला आणि त्यांचे बालपण गेले, त्या ऐतिहासिक भूमीवर आयोजित या सोहळ्याने शिवविचारांचा जागर करत उत्साह शिगेला पोहोचवला.
