सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच आता या योजनेतील पात्र महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना असे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेचे फॉर्म आधी भरले नव्हते त्या महिला सुद्धा आता फॉर्म भरत आहेत. मात्र आधी फॉर्म भरू नये अजून पैसे न आल्याच्या तक्रारी अनेक महिलांच्या आहेत. पैसे न येण्यामागचं एक मुख्य कारण आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणं हे सुद्धा आहे. त्यामुळे आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही आणि जर नसेल तर ते कसं लिंक करायचं वाचा सविस्तर
1. सर्वात आधी गुगलवर जाऊन my aadhar असे सर्च करा. त्यानंतर माय आधार ची वेबसाईट दिसेल यावर क्लिक करून आधार कार्ड नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा टाकून लॉगिन करा.
2. त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो टाकल्यानंतर लॉगिन पूर्ण होईल
3. आता तुम्हाला स्क्रीनवर आधार कार्डचा होम स्क्रीन दिसेल. मग खाली स्क्रोल केल्यावर Bank seeding status हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
4. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, बँकेचे नाव आणि Bank seeding status दिसेल. आधार कार्ड लिंक नसेल तर स्टेटस इनऍक्टिव्ह दिसेल.
अशा पद्धतीने तुम्ही आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासू शकता. आणि आता जर तुमचा आधार कार्ड लिंक नसेल तर ते लिंक कसं करायचं तेही वाचा.
1. सर्वप्रथम गुगलवर जाऊन NPCI म्हणजेच National Payment Corporation of India असं सर्च करा. मग तुम्हाला npci.org.in ही अधिकृत वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा.
2. वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करा. तिथे consumer हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. आणि आता Bharat Aadhar seeding या पर्यायासमोर enable वर क्लिक करा.
3. क्लिक करताच एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर आधार कार्ड नंबर टाकून request for Aadhar वर क्लिक करून seeding या पर्यायावर क्लिक करा.
4. आता तुम्हाला ज्या बँकेचं अकाउंट लिंक करायचं आहे, त्याचं नाव सिलेक्ट करून नव्याने लिंक करण्याच्या पर्यायावर म्हणजेच fresh seeding या पर्यायावर क्लिक करा.
5. त्यानंतर आता तुमच्या बँक खात्याचा नंबर टाका. खाली दिसणाऱ्या टर्म्स अँड कंडिशन्स वर ओके करून प्रोसिड वर क्लिक करा.
6. पुन्हा नवीन पेजवर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स दिसतील, तिथे Agree and Continue वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका. आणि अशा पद्धतीने तुम्ही अगदी पाच मिनिटात तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक करून घेऊ शकता.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि यासारख्या अनेक सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांना केवळ बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे लाभ मिळत नसल्याचे अनेक वेळा आढळून येते. त्यामुळे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.